India vs Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, T20 मध्ये हार्दिक पांड्या कर्णधार

WhatsApp Group

भारतीय वरिष्ठ निवड समितीने जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या भारत दौऱ्यावर श्रीलंकेचा संघ तीन टी-20 सामने आणि तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. हार्दिक पांड्याला टी-20 मालिकेसाठी कर्णधारपद देण्यात आले आहे तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा कर्णधार असेल आणि हार्दिक पांड्या उपकर्णधारपदाची धुरा सांभाळेल.

शिवम मावी, मुकेश कुमार आणि राहुल त्रिपाठी या युवा खेळाडूंना टी-20 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. त्याचवेळी, केएल राहुल आणि ऋषभ पंत टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा भाग नाहीत. याशिवाय रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे देखील टी-20 मालिकेत नाहीत.

एकदिवसीय मालिकेत हार्दिक पांड्याला रोहित शर्माचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. भविष्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, एकदिवसीय मालिकेत ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह नसून वनडे मालिकेत विराट कोहली आणि केएल राहुल यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर मोहम्मद शमीचेही वनडेत संघात पुनरागमन झाले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिखर धवनला वनडे मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. याआधी अनेक वेळा धवनने वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे.

टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना: 3 जानेवारी, मुंबई
दुसरा सामना : 5 जानेवारी, पुणे
तिसरा सामना : 7 जानेवारी, राजकोट

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना: गुवाहाटी
दुसरा सामना : कोलकाता
तिसरा सामना: तिरुवनंतपुरम

T20 मालिकेसाठी भारतीय संघ: हार्दिक पंड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग , हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव , अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा