नवी दिल्ली – आज कोरोना रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आठ महिन्यांनी हा पुन्हा एकदा 3 लाखांचा आकडा गाठला आहे. यासोबतच 491 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत 3,17,532 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत India reports 3,17,532 new COVID cases . तर ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 9,287 वर पोहोचली आहे.
India reports 3,17,532 new COVID cases, 491 deaths, and 2,23,990 recoveries in the last 24 hours.
Active case: 19,24,051
Daily positivity rate: 16.41%9,287 total Omicron cases detected so far; an increase of 3.63% since yesterday pic.twitter.com/L4KnawIEAd
— ANI (@ANI) January 20, 2022
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 19,24,051 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 2,23,990 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या दैनिक संसर्ग दर 16.41 टक्के आहे, तर साप्ताहिक संसर्ग दर 16.06 टक्के आहे.