IND vs PAK | Asia Cup 2023 मध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा भिडणार, या दिवशी होणार सामना

0
WhatsApp Group

श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या शेवटच्या गट-बी सामन्यानंतर आशिया चषक 2023 मधील सुपर-4 सामन्यांचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यजमान पाकिस्तानने ग्रुप-एमध्ये अव्वल स्थान पटकावले, तर भारताने दुसऱ्या क्रमांकासह सुपर-4मध्ये स्थान मिळवले आहे. ब गटाबद्दल बोलायचे झाले तर श्रीलंका अव्वल स्थानावर राहिला तर बांगलादेश संघ दुसऱ्या स्थानावर राहून सुपर-4 मध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला. नेपाळ आणि अफगाणिस्तानचे संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. सुपर-4 चा पहिला सामना आज 6 सप्टेंबर रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लाहोरमध्ये खेळवला जाईल. तर भारतीय संघ सुपर-4 मध्ये पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध 10 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये खेळणार आहे.

आशिया चषक स्पर्धेतील भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर, पहिला गट-अ सामना पाकिस्तानविरुद्ध होता, जो पावसाने रद्द  झाला होता. भारताचा दुसरा सामना नेपाळशी झाला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस पद्धतीने नेपाळचा 10 गडी राखून पराभव केला. आता सुपर-4 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 10 सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे.

6 सप्टेंबर रोजी लाहोरमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या सुपर-4 सामन्यानंतर आशिया चषकाचे उर्वरित सर्व सामने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवले जातील. पल्लेकेलेप्रमाणेच कोलंबोमध्येही पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत काही सामने रद्द होण्याचा धोका आहे. यापूर्वी सुपर-4 हंबनटोटा येथे हलवण्याची चर्चा होती, परंतु आता सर्व सामने कोलंबोतच खेळवले जातील.

आशिया कप 2023 सुपर-4 चे पूर्ण वेळापत्रक

  • 6 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश
  • 9 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
  • 10 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
  • 12 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका
  • 14 सप्टेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
  • 15 सप्टेंबर – भारत विरुद्ध बांगलादेश

17 सप्टेंबर – अंतिम सामना