Ind vs NZ 1st T20: भारत-न्यूझीलंड पहिला T20 सामना पावसामुळे रद्द

WhatsApp Group

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना स्काय स्टेडियम वेलिंग्टन येथे खेळवला जाणार होता, परंतु वेलिंग्टनमध्ये संततधार पावसामुळे सामना रद्द करण्यात आला आहे. वेलिंग्टनमधील सामन्यापूर्वी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. सामना पुन्हा सुरू होईल असे वाटत होते, परंतु तसे झाले नाही आणि तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना रद्द करण्यात आला.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला भारतीय T20 संघाचा कर्णधारपद देण्यात आले आहे तसेच अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्या पहिल्यांदाच न्यूझीलंड दौऱ्यावर टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. यापूर्वी त्याने कधीही न्यूझीलंडच्या भूमीवर T20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले नव्हते.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना रद्द करण्यात आला आहे, परंतु दुसरा T20 सामना 20 नोव्हेंबर रोजी तर तिसरा सामना 22 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्याचवेळी, T20 मालिकेनंतर, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल, ज्याचे नेतृत्व शिखर धवन करेल.

भारताचा संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋषभ पंत, इशान किशन, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र सिंग चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अरशकुमार आणि उमरान मलिक.

न्यूझीलंडचा संघ : केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हॉन कॉनवे, लकी फर्ग्युसन, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.