India vs West Indies : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा संपूर्ण संघ

WhatsApp Group

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे India vs West Indies. या भारतीय संघाचे नेतृत्व अनुभवी फलंदाज शिखर धवनकडे Shikhar Dhawan सोपवण्यात आले आहे. तर या संघाचा उपकर्णधार रवींद्र जडेजा Ravindra Jadeja असणार आहे. भारतीय संघ २२ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधी वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वन-डे आणि ५ टी-२० सामने खेळणार आहे.

असा आहे वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ: शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अवेश खा , प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग