
India Lockdown Teaser : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जगभरातील देशांनी आपापल्या ठिकाणी अंतर्गत लॉकडाऊन लागू केले होते. लॉकडाऊन असूनही जगभरात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत होती, तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे लोक उदरनिर्वाहासाठी धडपडताना दिसत आहेत, याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्याने देश हादरला होता. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी देशाच्या समस्या सांगणारा इंडिया लॉकडाऊन हा चित्रपट बनवला आहे. आता या चित्रपटाचा टीझर मंगळवारी प्रदर्शित झाला आहे.