IND vs IRE 2nd T20: भारत-आयर्लंड दुसरा टी-20 सामना आज, युवकांच्या कामगिरीवर असेल नजर!

WhatsApp Group

IND vs IRE 2nd T20 : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज (28 जून) डब्लिन येथे खेळवला जाणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात चाहत्यांच्या नजरा वेगवान गोलंदाज उमरान मलिकवर असतील, त्याला आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे.

पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे फलंदाजी करू शकला नाही. ऋतुराज तंदुरुस्त नसल्यास प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारने पहिल्या सामन्यात आयर्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते.  मात्र, आवेश खानला डेथ ओव्हर्समध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यामुळे या सामन्यात युवा खेळाडू आवेश खानच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील.

पहिल्या सामन्यात हॅरी टेक्टर वगळता आयर्लंडच्या बाकीच्या सर्व फलंदाजांनी निराशा केली. या सामन्यात आयरिश गोलंदाजांना गोलंदाजीतही चांगली कामगिरी करावी लागेल. टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल.

भारताचा संघ – ऋतुराज गायकवाड, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या(कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, युझवेंद्र चहल, आवेश खान.

आयर्लंडचा संघ – पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबिर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलनी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, जॉर्ज डॉकरेल, अँडी मॅकब्रायन, मार्क अडायर, क्रेग यंग, ​​जोशुआ लिटल, कोनर ओल्फर्ट.