IND vs WI 3rd T20: सूर्या पुन्हा चमकला, भारताने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून केला पराभव

WhatsApp Group

IND vs WI 3rd T20: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना वॉर्नर पार्क, सेंट किट्स येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव करत पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 5 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या. यजमानांसाठी काइल मेयर्सने 50 चेंडूत 73 धावा केल्या. कर्णधार निकोलस पूरनने 22 आणि शिमरॉन हेटमायरने 20 तर रोव्हमन पॉवेलने 23 धावा केल्या. भारताने हे लक्ष्य एक षटक शिल्लक असताना 3 विकेट्स गमावून पूर्ण केले.

या सामन्यात सूर्यकुमार यादवने टीम इंडियासाठी 76 धावांची तुफानी इनिंग खेळली. सूर्याला सलामीला पाठवण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र त्यांने सर्वांची बोलतीच बंद केली. आपल्या खेळीत त्याने 8 चौकार, 4 षटकार खेचले आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला.

कर्णधार रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाल्याने सुरुवातीला पॅव्हेलियनमध्ये परतला होता, तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. सूर्यकुमार यादवशिवाय ऋषभ पंतनेही 26 चेंडूत 33 धावांची नाबाद खेळी खेळली आणि शेवटी टीम इंडियाला विजय मिळवून देऊन परतला. श्रेयस अय्यरने 24 आणि हार्दिक पांड्याने 4 धावा केल्या.

वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली, मात्र नंतर त्यांच्या विकेट पडत राहिल्या. अखेरीस रोव्हमन पॉवेल (23 धावा) आणि शिमरॉन हेटमायर (20 धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे धावसंख्या 164 धावांपर्यंत पोहोचली. या दोन फलंदाजांनी मिळून 19 चेंडूत 34 धावांची भागीदारी केली.काइल मेयर्सने वेस्ट इंडिजकडून 73 धावांची मोठी खेळी खेळली, ज्यात त्याने 8 चौकार आणि 4 षटकारही मारले. या सामन्यात टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमारने 2, तर हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगने 1-1 विकेट घेतली.