IND W vs WI W: दक्षिण आफ्रिकेत चालू असलेल्या महिला टी-20 विश्वचषक 2023 मधील भारतीय संघाचा दुसरा सामना 15 फेब्रुवारी रोजी केपटाऊनमधील न्यूलँड्स स्टेडियमवर वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने 6 गडी गमावून 118 धावा केल्या, ज्यात टेलरने 42 धावांची खेळी केली. त्याचवेळी 119 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने 6 गडी राखून सामना जिंकला. भारताने 18.1 षटकांत लक्ष्य गाठले आणि स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला.
पहिल्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी झाला होता, ज्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली होती. त्याचवेळी वेस्ट इंडिज संघाचा इंग्लंडविरुद्ध 7 विकेट्सने दारूण पराभव झाला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध भारताच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. तिरंगी मालिकेत भारताने वेस्ट इंडिजचा दोनदा पराभव केला.
✅ Win vs Pakistan
✅ Win vs West IndiesA near-perfect start to India’s campaign 🙌#INDvWI #T20WorldCup
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 15, 2023
टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या इतिहासात भारतीय महिला संघाने आतापर्यंत एकूण 20 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजच्या महिला संघाचा सामना केला आहे. भारतीय महिला संघाने 12 सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिज संघाने आठ सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग-इलेव्हन खालीलप्रमाणे:
भारतीय महिला संघ: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (क), दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), पूजा वस्त्राकर, देविका वैद्य, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, रेणुका सिंग ठाकूर.
वेस्ट इंडिज महिला संघ: हेली मॅथ्यूज (क), स्टॅफनी टेलर, शेमेन कॅम्पबेले, शबिका गजनाबी, चिनेल हेन्री, चाडियन नेशन, अफी फ्लेचर, करिश्मा रामहारक, शमिलिया कोनेल, रश्दा विल्यम्स (विकेटकीपर), शेकेरा सेलमन.