IND vs ENG 3rd ODI : इंग्लंडला धूळ चारत भारतानं शेवटचीही वनडे जिंकली; मालिका 2-1 अशी टाकली खिशात!

WhatsApp Group

IND vs ENG 3rd ODI: ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव केला. ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यातील विजयासह भारताने एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 45.5 षटकांत सर्वबाद 259 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने 41 षटकांत 5 गडी गमावून 236 धावा केल्या. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने 5 षटकांतच सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. धवन एक धाव आणि रोहित 17 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि 1 धावा करून बाद झाला. सूर्यकुमारने पंतसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला पण तोही 16 धावा करून बाद झाला. त्यानंतर पंत आणि हार्दिकने शतकी भागीदारी करत डावाची धुरा सांभाळली. हार्दिक आणि पंत यांनी पाचव्या विकेटसाठी 115 चेंडूत 133 धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्या 55 चेंडूत 71 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर पंतने जडेजासोबत सहाव्या विकेटसाठी 40 चेंडूत 56 धावांची भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला. ऋषभ पंतचे वनडे कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. रवींद्र जडेजाने 15 चेंडूत 7 धावा केल्या. इंग्लंडकडून रीस टोपलीने 3, कार्स आणि ऑर्टनने 1-1 बळी घेतला.

इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने 60 धावा केल्या. बटलरशिवाय जेसन रॉयने 41, मोईन अलीने 34, क्रेग ओव्हरटनने 32 आणि बेन स्टोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 27-27 धावांचे योगदान दिले. भारताकडून हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी करत 7 षटकात 24 धावा देत 4 बळी घेतले. हार्दिकच्या वनडे कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. त्याच्याशिवाय युझवेंद्र चहलने तीन आणि मोहम्मद सिराजने दोन तर रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली.