
IND vs ENG 1st ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला गेला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची सर्वोत्तम गोलंदाजी आणि मोहम्मद शमीच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला अवघ्या 110 धावांमध्ये सर्वबाद केलं. टीम इंडियाला विजयासाठी 111 धावांची गरज होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अवघ्या 18.4 षटकांत एकही विकेट न गमावता 114 धावा केल्या आणि सामना जिंकला. भारताकडून रोहित शर्माने 58 चेंडूत 76 धावा आणि शिखर धवनने 54 चेंडूत 31 धावा केल्या. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना गुरुवारी होणार आहे.
नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बुमराहने पहिल्याच षटकात दोन बळी घेतले. मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी त्यांचा चांगला खेळ करून यजमानांना केवळ 110 धावा करू दिल्या.
A clinical performance from #TeamIndia to beat England by 10 wickets 👏👏
We go 1️⃣-0️⃣ up in the series 👌
Scorecard ▶️ https://t.co/8E3nGmlNOh #ENGvIND pic.twitter.com/zpdix7PmTf
— BCCI (@BCCI) July 12, 2022
इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला 30 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत आणि चार फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. जोस बटलरने सर्वाधिक 30 धावा केल्या असून डेविड विलीने 21 धावा केल्या. इंग्लंडच्या 68 धावांत आठ विकेट पडल्या. पण डेव्हिड विली आणि ब्रायडेन कार्सने नवव्या विकेटसाठी 35 धावा जोडून इंग्लंडला 100 च्या पुढे नेले. रीस टोपलीने इंग्लंडच्या डावातील एकमेव षटकार ठोकला.