रोमहर्षक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सनी केला पराभव, सूर्या-विराटची चमकदार खेळी

WhatsApp Group

IND vs AUS 3rd T20: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 ने जिंकली. भारताने 9 वर्षांनंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकली आहे.

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 विकेट गमावत 186 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने शेवटच्या षटकात लक्ष्याचा पाठलाग केला. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 69 धावा केल्या. त्याचवेळी विराट कोहलीने 63 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांचे अर्धशतक आणि दोघांमधील शतकी भागीदारीमुळे भारताने तिस-या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करून तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली.

ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि 30 धावांपर्यंत संघाने आपल्या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. केएल राहुल 1 धावा करत तंबूत परतला तर कर्णधार रोहित शर्मा 17 धावा करून बाद झाला. मात्र, यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी 62 चेंडूत 104 धावांची शतकी भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. सूर्यकुमारने 36 चेंडूंत 5 चौकार आणि तब्बल षटकारांच्या मदतीने 69 धावांची धडाकेबाज खेळी खेळली.

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर भारताला विजयासाठी शेवटच्या सहा षटकांत 53 धावा हव्या होत्या आणि कोहलीने पांड्यासह ही आव्हान सहज गाठले. विराटने 48 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 63 धावांची शानदार खेळी खेळली आणि कारकिर्दीतील 33 वे अर्धशतक पूर्ण केले. हार्दिकने 16 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा