World Record: भारताने 18 वर्षांनंतर तोडला पाकिस्तानचा ‘हा’ विश्वविक्रम, गिनीज बुकमध्ये नोंद

WhatsApp Group

भारताने जगात पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. जगातील सर्वाधिक ध्वज एकाच वेळी फडकवून त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील भोजपूरमध्ये ‘वीर कुंवर सिंह विजयोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत 78,220 लोकांनी एकाच वेळी तिरंगा ध्वज फडकावला. बिहारमधील जगदीशपूरचे तत्कालीन राजा वीर कुंवर सिंग यांना 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील नायक मानले जाते. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. सुमारे 18 वर्षांपूर्वी लाहोरमध्ये 56 हजार पाकिस्तानींनी एकत्रितपणे राष्ट्रध्वज उभारला होता. आता 18 वर्षांनंतर भारताने हा विक्रम मोठ्या फरकाने मोडला आहे.


बिहारच्या लोकांनी एवढ्या मोठ्या संख्येने एका ठिकाणी एकत्र येऊन तिरंगा फडकावला. या आकडेवारीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमने पुष्टी करण्यात आली आहे. केली.