
हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेचा ५ विकेट्सने पराभव केला India beat Zimbabwe . यासह भारताने या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर दुसऱ्या वनडेतही झिम्बाब्वे संघाच्या फलंदाजांनी निराशा केली. संघ 38.1 षटकांत 161 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारताने 25.4 षटकात 5 विकेट गमावून 167 धावा करत सामना आपल्या नावावर केला.
162 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला पहिला धक्का कर्णधार केएल राहुलच्या रूपाने बसला. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या आशिया चषकापूर्वी कर्णधार केएल राहुलने शिखर धवनसोबत फलंदाजीच्या सरावासाठी डावाची सुरुवात केली पण दुसऱ्याच षटकात व्हिक्टर न्युचीने पाच चेंडूत एक धावा काढून त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले, त्यानंतर धवन आणि गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी खेळी झाली. 29 चेंडूत 42 धावांची शानदार भागीदारी झाली. मात्र, 21 चेंडूत 33 धावा करून धवन बाद झाला.
तिसर्या विकेटसाठी इशान किशन आणि गिल यांच्यात 36 धावांची भागीदारी झाली होती, मात्र किशन अवघ्या 6 धावा करून बोल्ड झाला. गिलही 34 चेंडूत 33 धावा केल्यानंतर काही वेळाने बाद झाला. दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांनी पाचव्या विकेटसाठी 58 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. हुड्डा 36 चेंडूत 25 धावा करून बाद झाला.यानंतर संजू सॅमसनने 26व्या षटकात षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. सॅमसनने 39 चेंडूत 43 धावा केल्या. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले.
India seal a convincing win in Harare to go 2-0 up in the series 🎉
Watch #ZIMvIND LIVE on https://t.co/CPDKNxoJ9v with an ODI Series Pass (in select regions) 📺 | Scorecard: https://t.co/bIA0RD27gl pic.twitter.com/lZebyGoSkA
— ICC (@ICC) August 20, 2022
तत्पूर्वी, संघात पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर भारताने शनिवारी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेचा डाव 161 धावांत गुंडाळला. दीपक चहरच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळवणाऱ्या ठाकूरने 12व्या षटकात झिम्बाब्वेला दुहेरी धक्का दिला. त्याने सात षटकांत ३८ धावा देत तीन बळी घेतले.
झिम्बाब्वेसाठी सीन विल्यम्सने 42 चेंडूत एक षटकार आणि तीन चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. तो क्रीजवर आला तेव्हा यजमानांची धावसंख्या 13व्या षटकात 4 बाद 31 अशी होती. विल्यम्सला ऑफस्पिनर दीपक हुडाने डीप स्क्वेअर लेगवर शिखर धवनने झेलबाद केले.