भारताचा शानदार विजय! जपानचा 35-1 ने पराभव करत अंतिम फेरीत मारली धडक

0
WhatsApp Group

पुरुष हॉकी 5s विश्वचषक पात्रता फेरीच्या उपांत्य फेरीत भारताने जपानचा 35-1 असा पराभव केला. यापूर्वी मलेशियाचा 7-5 असा पराभव झाला होता. गुरुवारी दोन विजयानंतर भारताने 12 गुणांसह पूल टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले. उपांत्य फेरीचे सामने शनिवारी होणार आहेत. जपानविरुद्धच्या सामन्यात मनिंदरने दहा तर मोहम्मद राहिलने सात, पवन राजभर आणि गुरज्योत सिंगने प्रत्येकी पाच गोल केले. सुखविंदरने चार, कर्णधार मनदीप मोरने तीन तर जुगराज सिंगने एक गोल केला. जपानचा एकमेव गोल मसाटकाने केला. यापूर्वी मलेशियाविरुद्ध गुरजोतने पाच तर मनिंदर सिंग आणि मोहम्मद राहिल यांनी प्रत्येकी एक गोल केला होता.