Aisa Cup 2022: यजमान इंडोनेशियाचा भारताने 16-0 ने केला पराभव

WhatsApp Group

गतविजेत्या भारताने यजमान इंडोनेशियाचा 16-0 असा पराभव करत आशिया चषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. भारताचे भवितव्य त्यांच्याच  हातात होते कारण इंडोनेशियाविरुद्धचा विजय त्यांना बाद फेरीत जाण्यासाठी खूप महत्वाचा होता. भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली होती त्यानंतर जपानकडून भारताला 2-5 असा पराभव पत्करावा लागला होता.

भारतासाठी हा सामना जिंकणे खूप गरजेचे होते. यजमान इंडोनेशियावरील या मोठ्या विजयासह भारतीय हॉकि संघाने आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये थेट एन्ट्री घेतली आहे. आशिया चषका 2022मध्ये भारताचा हा पहिला विजय आहे. भारताला पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून 1-1 अशी बरोबरी पत्करावी लागली होती आणि त्यानंतर जपानकडून 2-5 असा पराभव पत्करावा लागला होता. जपानने पूल ‘ए’ मध्ये पहिले स्थान पटकावले. जपानने त्यांचे सर्व सामने जिंकले आहेत.

भारताने या सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवले आणि पहिल्या क्वार्टरमध्येच गोल केले. यानंतर टीम इंडियाने स्कोअरचा वेग वाढवला, पहिल्या क्वार्टरमध्ये भारताचा स्कोर 3-0 होता, जो दुसऱ्या क्वार्टरमध्ये 6-0 असा झाला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये हा स्कोअर 10-0 वर गेला आणि शेवटी स्कोर 16-0 वर गेला. यासह टीम इंडियाने इंडोनेशियावर दमदार विजय नोंदवला.