India Attacks Pakistan: “पाकिस्तान नकाशावर दिसणार नाही, हा फक्त ट्रेलर आहे”, ऑपरेशन सिंदूरबद्दल एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

WhatsApp Group

नागपूर: ऑपरेशन सिंदूरबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले की, “पाकिस्तानमध्ये भारतावर हल्ला करण्याची हिंमत नाही. भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना धडा शिकवला आहे. जर त्यांनी यावेळी भारताविरुद्ध काही केले तर आपले सशस्त्र दल पाकिस्तानचा नाश करतील आणि पाकिस्तान नकाशावर दिसणार नाही हा फक्त ट्रेलर आहे. जर पाकिस्तानने जास्त हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना योग्य उत्तर मिळेल. आमच्या सशस्त्र सैनिकांनी कोणत्याही नागरिकांवर हल्ला केलेला नाही. त्यांनी फक्त या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत आणि त्यांना धडा शिकवला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

पाकिस्तानने भारतातील सात प्रमुख शहरांना लक्ष्य करण्याचा घातक प्रयत्न केल्यानंतर भारताने तात्काळ आणि ठोस प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी वेळेत माहिती मिळवून संभाव्य दहशतवादी कारवायांचे वेळेवर निराकरण केले. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर आणि हवाई दलाने पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी ठोक कारवाई केली आहे.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये केलेल्या लक्षवेधी कारवाईने दहशतवाद्यांचे महत्त्वाचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर लाहोर आणि कराची येथेही अत्यंत अचूक आणि नियोजित पद्धतीने केलेल्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.