ना विराट ना रोहित, न्यूझीलंडविरुद्ध ‘हा’ मराठमोळा खेळाडू असेल भारताचा कर्णधार
मुंबई – न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिग्गज फलंदाज नसणार आहेत. कारण या दोन्ही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेकडे देण्यात आले आहे. तर उपकर्णधारपद दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराकडे सोपवण्यात आले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कानपूर येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी १६ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा
अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मो. सिराज, प्रसीध कृष्णा.
ICYMI: Here’s India’s squad for the 2⃣-match #INDvNZ Test series ????#TeamIndia pic.twitter.com/gQcaKa1YWS
— BCCI (@BCCI) November 12, 2021