Independence Day 2023: स्वातंत्र्यदिनानिमित्त बनवा चविष्ट ‘तिरंगा इडली’! जाणून घ्या सोपी रेसिपी

0
WhatsApp Group

Independence 2023 Recipe: 15 ऑगस्ट 1947 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिलेला दिवस. याच दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. शेकडो लोकांच्या रक्ताने लाल झालेल्या भारताची मातीने स्वातंत्र्याचा आजचा दिवस पाहिला. भारत ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.अशा परिस्थितीत, स्वातंत्र्याचा हा खास सोहळा साजरा करण्यासाठी लोक घरच्या घरी स्वातंत्र्य दिनाच्या रेसिपीसारखे खास पदार्थ बनवत आहेत. जर तुम्हालाही देशभक्तीच्या रंगात रंगून जायचे असेल आणि हा उत्सव एका खास पद्धतीने साजरा करायचा असेल तर आम्ही तुम्हाला यासाठी एक उत्तम पदार्थ सांगणार आहोत.

ही रेसिपी म्हणजे तिरंगा इडली रेसिपी. ही खास तिरंगा डिश तुम्ही नाश्त्यात बनवू शकता. चला जाणून घेऊया तिरंगा इडली बनवण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे. तसेच ते बनवण्यासाठी किती वेळ लागेल-

तिरंगा इडली बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी 

तांदूळ – 200 ग्रॅम
उडीद डाळ – 100 ग्रॅम
चवीनुसार मीठ
गाजर प्युरी – 20 ग्रॅम
पालक – 20 ग्रॅम (उकडलेले)

केवळ भारतच नाही तर ‘हे’ 5 देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाले, तुम्हाला किती देशांबद्धल माहिती आहे?

तिरंगा इडली कशी बनवायची

1. तिरंगा इडली बनवण्यासाठी प्रथम तांदूळ आणि उडीद डाळ 2 तास भिजत ठेवा.
2. यानंतर दोन्ही बारीक करून पेस्ट बनवा.
3. यानंतर रात्रभर ठेवा म्हणजे त्यात यीस्ट उठेल.
4. आता या पिठाचे तीन भाग करा.
5. एका भागात गाजर प्युरी आणि एका भागात पालक प्युरी मिक्स करा.
6. आता तिन्ही पिठल्या इडलीच्या साच्यात घाला आणि 20 ते 25 मिनिटे वाफवून घ्या.
7. तुमच्या तिरंगा इडल्या तयार आहेत. वेगवेगळ्या चटण्यांसोबत सर्व्ह करा.