IND vs ZIM: वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदला टीम इंडियात संधी

WhatsApp Group

Zimbabwe vs India ODI Series: झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताने वॉशिंग्टन सुंदरच्या जागी शाहबाज अहमदचा संघात समावेश केला आहे. दुखापतीमुळे सुंदर या मालिकेतून बाहेर पडला आहे. शाहबाजने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा एक भाग आहे. तो प्रथमच भारतीय संघात सामील झाला आहे.

शाहबाज देशांतर्गत सामन्यांमध्ये बंगाल संघाकडून खेळतो. तो भारत अ संघाकडूनही खेळला आहे. पण आता पहिल्यांदाच भारतीय संघाकडून कॉल आला आहे. शाहबाज हा स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहे. तो संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळतो. त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याची कामगिरी चांगली राहिली आहे. शाहबाजने प्रथम श्रेणी सामन्यांच्या 29 डावांमध्ये 1041 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत. यासोबतच त्याने 57 विकेट्सही घेतल्या आहेत.

शाहबाजने लिस्ट ए मध्ये 26 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 662 धावा केल्या आहेत. यासह त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने 24 विकेट्स घेतल्या आहेत. शाहबाजने आयपीएलमध्ये 29 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 13 विकेट्स घेण्यासोबत 279 धावा केल्या आहेत.

भारताचा संघ – केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्राणंदिक कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर शाहबाज अहमद.