
IND vs ZIM, 3rd ODI Playing 11: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आज (सोमवार) 22 ऑगस्ट रोजी वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना हरारे येथे भारतीय वेळेनुसार 12.45 वाजता खेळवला जाईल. शिखर धवनसह अनेक खेळाडूंना या सामन्यात विश्रांती मिळू शकते. जाणून घेऊया तिसऱ्या वनडेत टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल.
IPL 2022 मध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. राहुल बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात पदार्पणाची वाट पाहत आहे. याशिवाय तिसऱ्या सामन्यात ऋतुराज गायकवाडलाही अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकते.
टीम इंडियाने पहिले दोन वनडे जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. अशा स्थितीत तिसऱ्या वनडेत अनेक खेळाडूंना विश्रांती मिळू शकते. त्यात शिखर धवन, इशान किशन, अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या खेळाडूंचा समावेश असू शकतो. दुसरीकडे बंगालचा फिरकी अष्टपैलू शाहबाज अहमदला पदार्पणाची संधी मिळू शकते. आयपीएल 2022 मध्ये, त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी बॉल आणि बॅट दोन्हीसह चमत्कार केले.
भारताचा संघ
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.
झिम्बाब्वेचा संघ
रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.