IND vs WI : भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर! वाचा पूर्ण वेळापत्रक

WhatsApp Group

IND vs WI : भारतीय क्रिकेट संघाला (Team india) जुलैमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे, जिथे दोन्ही देशांदरम्यान 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि 5 सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका 22 जुलैपासून सुरू होणार आहे.

बीसीसीआय आणि क्रिकेट वेस्ट इंडिजने बुधवारी भारताच्या वेस्ट इंडिज दौर्‍याची घोषणा केली ज्यामध्ये 22 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय सामने आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील. 17 जुलै रोजी भारताचा ब्रिटनमधील मर्यादित षटकांचा दौरा संपेल आणि निवडले जाणारे खेळाडू इंग्लंडमधून थेट वेस्ट इंडिजला रवाना होतील.

त्रिनिदाद,टोबॅगो, सेंट किट्स आणि नेव्हिसमध्ये एकदिवसीय मालिका आणि तीन टी-20 सामने खेळवले जातील. शेवटचे दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने अमेरिकेतील फ्लोरिडा येथील फोर्ट लॉडरहिल येथे खेळवले जातील.

एकदिवसीय मालिका

पहिली वनडे: 22 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरी वनडे: 24 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
तिसरी वनडे: 27 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता)

टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका

पहिला टी-20: 29 जुलै, पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा टी-20: 1 ऑगस्ट, सेंट किट्स आणि नेव्हिस
तिसरा टी-20: 2 ऑगस्ट, सेंट किट्स आणि नेव्हिस
चौथी टी-20: 6 ऑगस्ट, फ्लोरिडा, यूएसए
पाचवी टी-20: 7 ऑगस्ट, फ्लोरिडा, यूएसए
(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 पासून)