IND Vs WI: भारताचा 5 गडी राखून विजय, इशान-कुलदीपची शानदार कामगिरी

0
WhatsApp Group

टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 5 गडी राखून जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कसोटी मालिका 1-0 ने जिंकणाऱ्या भारतीय संघाने वनडे मालिकेतही दमदार सुरुवात केली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 114 धावांवर गारद झाला. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 5 विकेट गमावल्या.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. भारताकडून कुलदीप यादवने 3 षटकांत 4 बळी घेतले. त्याचबरोबर जडेजानेही 3 विकेट्स घेण्यात यश मिळवले. याशिवाय शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार आणि हार्दिक पंड्या यांनी 1-1 विकेट घेतली. वेस्ट इंडिजकडून शाई होपने सर्वाधिक धावा केल्या. होपच्या बॅटमधून 43 धावा झाल्या.

टीम इंडियाने 5 विकेट गमावल्या
मात्र, 115 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 5 विकेट्सही गमावल्या. या सामन्यात ईशान किशनसह शुभमन गिलला सलामीसाठी पाठवले होते. शुभमनच्या बॅटमधून फक्त 7 धावा आल्या. त्याचबरोबर ईशानने टीम इंडियासाठी सर्वाधिक 52 धावांची खेळी खेळली. मात्र, हा खेळाडूही विकेट फेकून बाद झाला. याशिवाय सूर्यकुमार यादव 19, हार्दिक पांड्या 5 आणि शार्दुल ठाकूर केवळ 1 धावच करू शकले. शेवटी कर्णधार रोहित शर्माने 12 आणि रवींद्र जडेजाने 16 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

भारताने किंग्स्टन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामने खेळले असून त्यात फक्त एकच जिंकला आहे. टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या किंग्स्टन मैदानावर एकदाही 200 पेक्षा जास्त धावा केल्या नाहीत.

कुलदीप यादवची शानदार गोलंदाजी

वेस्ट इंडिजकडून कर्णधार साई होपने सर्वाधिक 43 धावा केल्या. अलिक अथांजाने 22 धावांचे योगदान दिले. याशिवाय अन्य कोणताही फलंदाज खात्रीने खेळू शकला नाही. ब्रँडन किंगने 17 आणि शिमरॉन हेटमायरने 11 धावा केल्या. वेस्ट इंडिजच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. कुलदीप यादवने तीन षटकांत दोन मेडन्स देत सहा धावांत चार बळी घेतले. हा त्याचा एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरा सर्वोत्तम स्पेल आहे. त्याचवेळी रवींद्र जडेजाला तीन यश मिळाले. पदार्पणाचा सामना खेळताना मुकेश कुमार, हार्दिक पंड्या आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

इशान किशनने कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले

लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवातही चांगली झाली नाही. शुभमन गिल (07 धावा) लवकर बाद झाला. सूर्य कुमार यादव सुरुवातीला चांगला दिसत होता, मात्र केवळ 19 धावांची इनिंग खेळल्यानंतर तो गुडाकेश मोटीच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. हार्दिक पंड्या (05 धावा) दुर्दैवी धावबाद झाला. पण ईशान किशनने दुसरे टोक सांभाळले. इशान किशनने कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. त्याने 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

52 धावांची खेळी खेळल्यानंतर इशान किशन मोतीचा दुसरा बळी ठरला. शार्दुल ठाकूरलाही (01) मोठी खेळी खेळता आली नाही. रवींद्र जडेजा (16 धावा) आणि रोहित शर्मा (12 धावा) यांनी 22.5 षटकात भारताला विजय मिळवून दिला.

दोन्ही संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार

वेस्ट इंडिज: शाई होप (कर्णधार), काइल मेयर्स, ब्रॅंडन किंग, अॅलिक अथांजे, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कारिया, डॉमिनिक ड्रेक्स, जयडेन सील्स, गुडाकेश मोती