
त्रिनिदाद येथे खेळल्या गेलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा 119 धावांनी पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेला शेवटचा सामना जिंकून भारताने पाकिस्तानचा मोठा विश्वविक्रम मोडला आहे. टीम इंडियाने एका देशाविरुद्ध सलग सर्वाधिक एकदिवसीय मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे.
पाकिस्तानने 1996-21 पासून द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वेचा 11 वेळा पराभव केला, जो भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी एकाच संघाविरुद्ध सलग एकदिवसीय मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम होता. पाकिस्तानने 25 वर्षांच्या कालावधीत हा विक्रम केला, तर टीम इंडियाने 2007 पासून एकही वनडे मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध गमावलेली नाही आणि हा ट्रेंड आताही कायम आहे. कारण भारताने सलग 12व्यांदा एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केला आणि आता कोणत्याही एका संघाविरुद्ध सलग एकदिवसीय मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम भारताच्या नावावर झाला आहे.
A clean sweep from captain Shikhar Dhawan and Co 🔥🇮🇳#ShikharDhawan #IndianCricketTeam #Cricket #WIvIND pic.twitter.com/GnYqSbaon5
— Sportskeeda (@Sportskeeda) July 27, 2022
झिम्बाब्वे तसेच वेस्ट इंडिजविरुद्ध सलग मालिका जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. 1999 ते 2022 पर्यंत, पाकिस्तानने सलग 10 वनडे मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. दक्षिण आफ्रिका संघ चौथ्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेने झिम्बाब्वेविरुद्ध 1995 ते 2018 या कालावधीत 9 वनडे मालिकेत क्लीन स्वीप केले.
संघाविरुद्ध सलग द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकणारे संघ
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (2007-22) * – 12 मालिका
पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे (1996-21) – 11 मालिका
पाकिस्तान वि वेस्ट इंडीज (1999–22) – 10 मालिका
दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे (1995-18) – 9 मालिका