दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर 2 गडी राखून विजय मिळवला आहे. यासह टीम इंडिया पाच सामन्यांच्या मालिकेत २-0 ने पिछाडीवर गेली आहे. दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने वेस्ट इंडिजला 153 धावांचे लक्ष्य दिले, जे विंडीज संघाने सहज गाठले.
भारतीय संघाकडून इशान किशन आणि शुभमन गिल यांना चांगली खेळी करता आली नाही. ईशानने 27 धावा, शुभमन गिलने 7 धावा, सूर्यकुमार यादवने 1 धावा केल्या मात्र हे फलंदाज बाद झाल्यानंतर टिलक वर्माने धावा करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याने 51 धावा केल्या. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 14 धावांचे योगदान दिले. या फलंदाजांमुळेच टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर आणि ओबेथ मॅकॉयने 2-2 बळी घेतले. अल्झारी जोसेफ आणि काइल मेयर्सच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट गेली.
West Indies take a 2-0 lead after a thrilling climax 💪#WIvIND | 📝: https://t.co/aak7tShfGz pic.twitter.com/dF4SeXiOX4
— ICC (@ICC) August 6, 2023
भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना निकोलस पूरनने वेस्ट इंडिजसाठी चांगली कामगिरी केली. त्याने 40 चेंडूत 67 धावा केल्या. पुरणच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. हेटमायरने 22 चेंडूत 22 धावा केल्या. कर्णधार रोव्हमन पॉवेलने 19 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. काइल मेयर्स 15 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. ब्रँडन किंग, जेसन होल्डर आणि शेफर्ड शून्यावर बाद झाले. अखेरीस अकिल हुसेन 16 धावा करून नाबाद राहिला. जोसेफने नाबाद 10 धावा केल्या. या दोन्ही खेळाडूंनी भारताकडून विजय हिसकावून घेतला.
भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादव नेटमध्ये फलंदाजी करताना जखमी झाला. याच कारणामुळे तो दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही. त्याच्या जागी रवी बिश्नोईला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. बिश्नोईने आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 26 टी-20 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी 17 सामने भारतीय संघाने जिंकले आहेत आणि 8 सामने वेस्ट इंडिज संघाने जिंकले आहेत. दोन्ही संघांकडे स्टार खेळाडूंची फौज आहे, जे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलू शकतात.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
वेस्ट इंडीज: ब्रॅंडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.
भारत: इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, रवी बिश्नोई.