
IND vs WI 1st T20: कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्या उत्कृष्ट खेळीनंतर, त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 68 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 6 गडी गमावून 190 धावांची मजबूत धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 122 धावाच करू शकला.
वेस्ट इंडिजकडून क्रीजवर राहून खेळण्याचे धाडस कोणत्याही फलंदाजाला करता आले नाही. यजमानांकडून शामर ब्रूक्सने 20, काइल मेयर्सने 15, कर्णधार निकोलस पूरनने 18, रोव्हमन पॉवेलने 14 आणि शिमरॉन हेटमायरने 14 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग, आर अश्विन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन तर भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
A dominant performance by our bowlers 👏👏#TeamIndia win the 1st #WIvIND T20I by 68 runs and take 1-0 series lead 💪 pic.twitter.com/H15eUfQZoK
— BCCI (@BCCI) July 29, 2022
भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 190 धावा केल्या. भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने (64) अर्धशतक झळकावत विश्वविक्रमही केला. रोहित पुन्हा T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलला मागे टाकले आहे. त्याचवेळी दिनेश कार्तिकने 19 चेंडूत नाबाद 41 धावांची खेळी केली.
कार्तिकने चार चौकार आणि दोन षटकार मारले. आर अश्विननेही नाबाद 13 धावा केल्या. रोहित आणि कार्तिकशिवाय सूर्यकुमार यादव (24), श्रेयस अय्यर (0), ऋषभ पंत (14), हार्दिक पांड्या (1), रवींद्र जडेजा (16) फार काही करू शकले नाहीत. वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफने दोन बळी घेतले.