India vs Sri Lanka: श्रीलंकेसमोर विजयासाठी 214 धावांचं आव्हान, ‘सूर्य’कुमार यादव चमकला

WhatsApp Group

IND vs SL 1st T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून (27 जुलै) टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भारतानं 2 गडी गमावून 125 हून अधिक धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत दमदार फलंदाजी केली. श्रीलंका विजयासाठी 214 धावांची गरज आहे.

या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. पॉवरप्लेमध्ये यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी चांगली फलंदाजी केली आणि दोघांनी 6 षटकात 74 धावांची भागीदारी केली. शुभमन गिलने 16 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारासह 34 धावा केल्या. शुभमनला दिलशान मदुशंकाने बाद केलं. शुभमननंतर वानिंदू हसरंगाच्या चेंडूवर जैस्वाल झाला. यशस्वीने 21 चेंडूंत 5 चौकार आणि दोन षटकारांसह 41 धावा केल्या. सूर्यकुमार यादवनं 58 धावा केल्या.

भारताकडून शिवम दुबे, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि खलील अहमद पहिल्या टी-20 सामन्यात खेळत नाहीत. टी-20 मालिकेतील सर्व सामने पल्लेकेले येथे होणार आहेत. यावेळी दोन्ही संघांची कमान नव्या कर्णधारांच्या हातात आहे. सूर्यकुमार यादव भारताचे कर्णधारपद भूषवत आहेत, तर चरिथ असलंका श्रीलंकेच्या टी-20 संघाचे नेतृत्व करत आहेत. त्याच वेळी, ही मालिका भारतासाठी गौतम गंभीरच्या कोचिंग युगाची सुरुवात करणार आहे.

दोन्ही देशांमधला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 10 फेब्रुवारी 2009 रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. जिथे भारतानं हा सामना 3 विकेटने जिंकला. श्रीलंकेनं प्रथम खेळताना 171/4 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतानं 4 चेंडू शिल्लक असताना 174/7 धावा करून हे लक्ष्य गाठलं.

या सामन्यातील विजयाचे नायक होते पठाण ब्रदर्स. युसूफ पठाणनं 10 चेंडूत 22 धावा केल्या तर इरफान पठाणने 16 चेंडूत 33 धावा केल्या. सामनावीर युसुफनेही या सामन्यात 2 बळी घेतले होते, तर इरफाननेही 1 बळी घेतला होता.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील हेड टू हेड आकडेवारी
सामने: 29, भारत जिंकला: 19, श्रीलंका 9, सामने अनिर्णित: 1

भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक

  • 27 जुलै- पहिला T20 सामना, पल्लेकेले
  • 28 जुलै- दुसरा टी-20 सामना, पल्लेकेले
  • 30 जुलै- तिसरा T20 सामना, पल्लेकेले
  • 2 ऑगस्ट- पहिला वनडे सामना, कोलंबो
  • 4 ऑगस्ट- दुसरा वनडे सामना, कोलंबो
  • 7 ऑगस्ट- तिसरा वनडे सामना, कोलंबो

श्रीलंकेचे प्लेइंग इलेव्हन: पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चारिथ असलंका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महिष तिक्षाना, मथिशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशानका.

भारताचे प्लेइंग इलेव्हन: शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत, रायन पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.