IND vs SA T20 Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेचे वेळापत्रक

WhatsApp Group

IND vs SA T20 Series: दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर टी-20 मालिकेसाठी येत आहे. पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक हा फ्युचर टूर कार्यक्रमाचा एक भाग आहे. या मालिकेची सुरुवात 9 जून रोजी पहिल्या टी-20 सामन्याने होणार आहे. तर शेवटचा सामना19 जून रोजी होणार आहे.

बीसीसीआयने या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा आधीच केली आहे. काही दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. केएल राहुलला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय दिनेश कार्तिकचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. ही मालिका बायो बबलमध्ये नसेल असेही बोर्डाने म्हटले आहे. मात्र, खेळाडूंना कोरोना चाचणीचा अहवाल द्यावा लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा

  • 9 जून, पहिला टी-20 सामना (अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली)
  • 12 जून, दुसरी टी-20 सामना (बाराबती स्टेडियम, कटक)
  • 14 जून, तिसरा टी-20 सामना (डॉ. वाई एस आर रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम)
  • 17 जून, चौथा टी-20 सामना (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट)
  • 19 जून, 5वी टी-20 सामना (एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ – केएल राहुल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड , इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.