IND vs SA: रोहित शर्माचा लज्जास्पद विक्रम, भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट

WhatsApp Group

IND vs SA 2022 Rohit Sharma: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला 49 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून मालिका 2-1 अशी जिंकली. दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतासमोर विजयासाठी 20 षटकात 228 धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु टीम इंडिया 18.3 षटकात केवळ 178 धावांवर आटोपली. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेचा संघ मालिकेत क्लीन स्वीप होण्यापासून वाचला. भारताकडून दिनेश कार्तिकने 21 चेंडूत सर्वाधिक 46 धावांची खेळी केली.

रोहित शर्माचा लज्जास्पद विक्रम

दक्षिण आफ्रिकेच्या 227 धावांना प्रत्युत्तर देण्यासाठी फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा एकही धाव न करता कागिसो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारतीय कर्णधार म्हणून रोहित शर्मा हा या फॉरमॅटमध्ये शून्यावर सर्वाधिक वेळा बाद होणारा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 4 वेळा एकही धाव न काढता कर्णधार म्हणून बाद झाला आहे. त्याचबरोबर या यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या तर शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विराट कोहली कर्णधार म्हणून 3 वेळा एकही धाव न काढता बाद झाला. तर शिखर धवन कर्णधार म्हणून एकदा शून्य धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. मात्र, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाचा कर्णधार म्हणून 62 डावात फलंदाजी केली, पण तो कधीही शून्यावर बाद झाला नाही. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्याबद्दल सांगायचे तर, प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाहुण्या संघाने रिले रोसोच्या नाबाद शतकाच्या जोरावर 20 षटकांत 3 गडी गमावून 227 धावा केल्या होत्या.