IND vs SA 1st ODI : भारत-दक्षिण आफ्रिका पहिली वनडे आज, ‘अशी’ असू शकते दोन्ही संघांची Playing 11

WhatsApp Group

IND vs SA 1st ODI Match Preview: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील एकदिवसीय सामने आजपासून सुरू होत आहेत. लखनौच्या एकना स्टेडियमवर दोन्ही संघ आज आमनेसामने येणार आहेत. या स्टेडियमवर टीम इंडिया प्रथमच एकदिवसीय सामना खेळणार आहे. या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची कमान शिखर धवनकडे आहे. भारताचा संपूर्ण संघ येथे बदललेला दिसेल. नुकत्याच संपलेल्या T20 मालिकेतील केवळ 2-3 खेळाडू या संघात आहेत.

टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत या मालिकेत युवा खेळाडूंना चांगली संधी मिळणार आहे. आयपीएलमध्ये दीर्घकाळ चांगली कामगिरी करणाऱ्या राहुल त्रिपाठीला यावेळी आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते. मोहम्मद सिराज आणि दीपक चहर यांच्यासाठीही ही महत्त्वाची मालिका असेल. या मालिकेत चांगली कामगिरी करून हे दोन्ही खेळाडू टीम इंडियाच्या T20 विश्वचषक संघात बुमराहची जागा घेण्याचा दावा करू शकतात.

अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात एकना स्टेडियमवर आतापर्यंत तीन एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या तीनही सामन्यांमध्ये चांगल्या धावा होऊ शकल्या नाहीत. मात्र, येथे नुकत्याच झालेल्या T20 सामन्यांमध्ये धावांचा पाऊस पडला आहे. अशा स्थितीत आजच्या वनडेत चांगल्या धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

भारताचा संघ – शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (डब्ल्यूके), रजत पाटीदार/राहुल त्रिपाठी, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, दीपक चहर.
दक्षिण आफ्रिकेचा संघ – टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, यानेमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा.