जोहान्सबर्ग येथे रविवारी खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना रविवारी (21 डिसेंबर) गाकेबरहा येथे होणार आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 27.3 षटकात केवळ 116 धावा केल्या. संघाकडून अँडिले फेहलुकवायो (33) याने सर्वाधिक धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 16.4 षटकात 2 गडी गमावून 117 धावा करत सामना सहज जिंकला. साई सुदर्शनने भारतासाठी सर्वाधिक 55* धावा केल्या. आफ्रिकेकडून मुल्डर आणि फेरलुक्वायो यांनी 1-1 बळी घेतला.
सोप्या लक्ष्याचा पाठलाग करतानाही भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. 23 धावांवर संघाने सलामीवीर रुतुराज गायकवाडच्या (5) रूपाने पहिली विकेट गमावली. त्याला वियान मुल्डरने बाद केले. मात्र, यानंतर स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (52) आणि सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 73 चेंडूत 88 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सुदर्शन (55*) हा भारतासाठी पदार्पणाच्या वनडे सामन्यात 5वी सर्वोच्च नाबाद खेळी खेळणारा फलंदाज ठरला. सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माच्या कारला अपघात
India go 1-0 up in the three-match series ✅
Watchh the #SAvIND ODIs on @StarSportsIndia pic.twitter.com/s5VWXXPVwG
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 17, 2023
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवत (200) एकदिवसीय सामन्यातील सर्वात मोठा विजय मिळवण्याचा हा भारताचा विक्रम आहे. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक चेंडू शिल्लक ठेवत भारताचा हा चौथा सर्वात मोठा विजयाचा विक्रम आहे.
अर्शदीप सिंगची अप्रतिम गोलंदाजी
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग रविवारी वेगळ्याच लयीत दिसला. त्याने प्रतिस्पर्धी संघाचे 5 फलंदाज बाद केले. त्याने 10 षटकात 37 धावा देऊन 5 बळी घेतले. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 3.70 होता. त्याने रीझा हेंड्रिक्स, टोनी डीजॉर्ज, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, हेनरिक क्लासेन आणि अँडिले फेहलुकवायो यांना बाद केले. LPG सिलिंडर आता 600 रुपयांत; तुम्ही देखील लाभ घेऊ शकता!
अर्शदीपने वनडेत पहिल्यांदाच 5 विकेट घेतल्या
अर्शदीपने रविवारी आपल्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने पहिल्यांदाच 5 विकेट घेतल्या.
वनडेमध्ये पहिल्या पॉवरप्लेमध्ये (1-10 षटके) इतर राष्ट्रांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी करणारा (4/19) तो भारतीय गोलंदाज बनला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (4/9 विकेट्स वि. इंग्लंड, ओव्हल) या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ (4/20विकेट्स वि. दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग) आहे.
अर्शदीपप्रमाणेच वेगवान गोलंदाज आवेश खाननेही शानदार गोलंदाजी करत प्रोटीज संघाला मर्यादित धावसंख्येपर्यंत रोखण्यात मोठी भूमिका बजावली. त्याने 3.40 च्या इकॉनॉमी रेटने 8 षटके टाकली आणि 27 धावांत 4 फलंदाज बाद केले. विशेषतः त्याने फक्त 3 मेडन ओव्हर टाकली. रविवारी त्याने त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याचा मुख्य बळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्कराम ठरला.