IND Vs PAK: पाकिस्तानचा दणदणीत विजय, भारताचा 8 विकेट्सने उडवला धुव्वा

अंडर 19 आशिया चषक स्पर्धेतील अ गटातील सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाने भारताचा 8 गडी राखून पराभव केला आहे.

WhatsApp Group

India vs Pakistan U19 Asia Cup: यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत रविवारी टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानने सलग दुसरा विजय नोंदवत भारतीय संघाचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना भारताने या सामन्यात 50 षटके खेळून 9 गडी गमावून 259 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघाने 47 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. शतक झळकावणाऱ्या पाकिस्तानच्या या विजयात अजान अवेस हिरो ठरला.

उपांत्य फेरीतून बाहेर पडण्याचा धोका
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा 7 विकेटने पराभव केला होता. आता दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर संघाला उपांत्य फेरीतून बाहेर पडण्याचा धोका आहे. मात्र, संघाला 12 डिसेंबरला नेपाळविरुद्ध शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे. जर संघ हा सामना हरला आणि तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत केले तर टेबल फिरू शकतात. त्या स्थितीत टीम इंडिया उपांत्य फेरीतूनही बाहेर पडू शकते.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने केवळ 259 धावा केल्या होत्या. आजच्या काळात एकदिवसीय क्रिकेटसाठी ही चांगली धावसंख्या नाही. भारताकडून आदर्श सिंग (62), कर्णधार उदय सहारन (60) आणि सिन धस यांनी 58 धावांची अर्धशतके झळकावली. मात्र या खेळी संघाला 300 पर्यंत नेऊ शकल्या नाहीत. प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघाने सुरुवातीपासूनच चांगली फलंदाजी केली.

पाकिस्तानच्या 260 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला सलामीवीर शमाईल हुसेन लवकर बाद झाला. मात्र यानंतर शाहजेब खानने 63धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्यानंतर अजान अवेसने सामना भारताच्या पकडीतून हिरावून घेतला आणि शानदार शतक झळकावले. नाबाद राहताना त्याने 130 चेंडूत 105 धावांची नाबाद शतकी खेळी केली. कर्णधार साद बेगने त्याला शेवटपर्यंत साथ दिली त्याने 61 धावांची नाबाद खेळी केली. आता पाकिस्तान आपला शेवटचा साखळी सामना 12 डिसेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. तिथे भारताचा सामना नेपाळशी होईल.

पाकिस्तानचा संघ: शमिल हुसैन, शाहजेब खान, अझान अवेस, साद बेग (विकेटकीपर/कर्णधार), मोहम्मद जीशान, मोहम्मद रियाझुल्ला, तय्यब आरिफ, अराफत मिन्हास, अली असफंद, अमीर हसन, उबेद शाह.

भारताचा संघ: आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, रुद्र पटेल, उदय सहारन (कर्णधार), मुशीर खान, सचिन धस, अरावली अवनीश (विकेटकीपर), सौम्या पांडे, मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी.

Vidyut Jammwalचे नको ते फोटो झाले व्हायरल, फॅन म्हणाला, ‘सोफिया अन्सारीची कारकीर्द संपणार…’