IND vs PAK : आज रंगणार भारत-पाकिस्तान यांच्यात हाय-व्होल्टेज सामना !

WhatsApp Group

आयसीसीच्या जेतेपदासाठी दीर्घकाळापासून आसुसलेला भारतीय महिला क्रिकेट संघ आज टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी भिडणार आहे, त्यामुळे या वेळी ही प्रतीक्षा संपवण्याचा त्यांचा इरादा असेल. संपूर्ण जगाच्या नजरा भारत-पाकिस्तान सामन्यावर खिळल्या आहेत. अशा स्थितीत सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा शेवटच्या चकमकीत पराभव केला असला तरी गेल्या पाच वर्षातील एकूण कामगिरीवर नजर टाकली तर भारतीय संघाचा वरचष्मा आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या वर्चस्वाला सातत्याने आव्हान देत आहे, तर पाकिस्तानी महिला संघ फार काही करू शकलेला नाही.

भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे बघायचा?
भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघांमधील हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सामना सुरू होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर केले जाणार आहे. डिस्ने + हॉटस्टार अॅपवरही सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारताचा वरचष्मा 
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघाचा वरचष्मा आहे. या कालावधीत भारताने 10 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने केवळ 3 सामने जिंकले आहेत.

भारताचा संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रकर, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड. .

पाकिस्तानचा संघ : बिस्माह मारूफ (कर्णधार), आयमान अन्वर, आलिया रियाझ, आयशा नसीम, ​​फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, नशरा संधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शम्स, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.