IND Vs PAK: भारत विरूद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अनुष्का शर्मा अहमदाबाद मध्ये दाखल

WhatsApp Group

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये आज भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे. ज्यासाठी सकाळपासूनच क्रिकेट जगत आणि चित्रपट तारे अहमदाबादमध्ये जमायला लागले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा 14 ऑक्टोबरच्या पहाटे अहमदाबाद विमानतळावर पोहोचली. भारत-पाकिस्तान सामन्यात अनुष्का पती कोहलीला चिअर करताना दिसणार आहे. कडेकोट बंदोबस्तात अनुष्का विमानतळाबाहेर पडताना दिसली.

दुसरीकडे, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरही सकाळच्या विमानाने मुंबईहून अहमदाबादला पोहोचला आहे. येथे पोहोचल्यावर सचिन म्हणाला की, तो टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी आला आहे आणि आमची टीम जिंकेल अशी आशा आहे. मीडियाशी बोलताना तो म्हणाला, “मी टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी आलो आहे. आशा आहे की, आम्हा सर्वांना हवा तसा निकाल मिळेल.”

गायक अरिजित सिंगही अहमदाबादला पोहोचला आहे. न्यूज एजन्सी एनएनआयने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये अरिजित सिंग विमानतळ सोडताना दिसत आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर अरिजित सिंग, सुखविंदर सिंग आणि शंकर महादेवन हे परफॉर्म करताना दिसणार आहेत.