IND vs NZ Warm up match: भारत विरुद्ध न्यूझीलंड सराव सामना पावसामुळे रद्द

WhatsApp Group

IND vs NZ: T20 विश्वचषक 2022 चा शेवटचा सराव सामना आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ब्रिस्बेनमधील गाबा येथे होणार होता, परंतु आज सकाळपासून ब्रिस्बेनमध्ये अधूनमधून पाऊस पडत असल्याने तो सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसामुळे सामन्यात एकही चेंडू टाकता आला नाही. यापूर्वी, पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सराव सामना देखील गाब्बा येथे पूर्ण होऊ शकला नाही आणि तो रद्द करावा लागला. त्याच वेळी, आता भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना देखील रद्द करण्यात आला आहे. आयसीसीने सामना रद्द झाल्याची पुष्टी केली आहे. भारताने पहिल्या सराव सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला होता.

हेही वाचा – IND vs PAK: हॉलिवूडपर्यंत भारत-पाकिस्तान मॅचची क्रेझ, WWE चा ‘द रॉक’ही मॅच पाहण्यासाठी आतुर, पाहा व्हिडिओ