भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने 12 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 8 गडी गमावून 349 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 337 धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यात शुबमन गिलने द्विशतक ठोकले, तर मोहम्मद सिराजने चेंडूसह 4 बळी घेतले.
1ST ODI. India Won by 12 Run(s) https://t.co/IQq47h2W47 #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 18, 2023