IND vs NZ: हिटमॅन इज बॅक…3 वर्षांनंतर वनडेत झळकावले शतक

WhatsApp Group

IND vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जात आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक ठोकलं आहे. त्याने 85 चेंडूत 101 धावा करत बाद झाला. या सामन्यात उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांना संधी मिळाली आहे. पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाने या मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत भारतीय संघ ही मालिका 3-0 ने जिंकण्याचा प्रयत्न करेल.

रोहितने रचला विश्वविक्रम

इंदूरमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने झंझावाती शतकाच्या जोरावर न्यूझीलंडविरुद्ध विश्वविक्रम केला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून सर्वोत्तम सरासरीने 5000 हून अधिक धावा करणारा तो नंबर वन खेळाडू बनला आहे. या प्रकरणात रोहितने महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि हाशिम आमला यांना मागे टाकले आहे. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून 55.9च्या सर्वोत्तम सरासरीने 5000 हून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हसिम आमला आहे, ज्याची वनडेमध्ये सरासरी 49.9 आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर महान फलंदाज सचिनचे नाव आहे, ज्याने सलामीवीर म्हणून एकदिवसीय सामन्यांमध्ये 48.3 च्या सरासरीने 5 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.

मोडला सनथ जयसूर्याचा विक्रम

रोहित शर्माने आपले शतक पूर्ण केले तोपर्यंत त्याने सहा षटकार ठोकले होते. दरम्यान, रोहित शर्माने षटकारांचा नवा विक्रम रचला. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, त्याने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला मागे टाकण्याचे काम केले आहे. रोहित शर्माच्या नावावर आता 272 षटकार आहेत. तर सनथ जयसूर्याने 270 षटकार ठोकले. रोहित शर्माने 270 षटकार मारण्यासाठी 445 एकदिवसीय सामने खेळले, तर रोहित शर्माने 272 षटकार मारण्यासाठी केवळ 241 एकदिवसीय सामने खेळले. आता वनडेत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत केवळ दोनच खेळाडू त्याच्या पुढे आहेत. पहिल्या क्रमांकावर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे, ज्याने 398 सामन्यात 351 षटकार ठोकले. दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आहे, ज्याने 301 सामन्यात 331 षटकार ठोकले.

रोहित शर्माला शतक पूर्ण करण्यासाठी केवळ 83 चेंडू लागले. या खेळाडूने आपल्या शानदार खेळीत एकूण 9 चौकार आणि 6 षटकार मारले. रोहितचे हे शतक 2020 नंतर आले. रोहितने 19 जानेवारी 2020 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे वनडे शतक झळकावले. रोहितशिवाय शुभमन गिलनेही या सामन्यात आपले शतक पूर्ण केले आहे. तो 112 धावा करत तंबूत परतला.

भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक.

न्यूझीलंडचा संघ: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार आणि यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा