भारतीय क्रिकेट संघाने प्रथम श्रीलंकेला आणि नंतर न्यूझीलंडला एकदिवसीय मालिकेत पराभूत करत नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात केली. टीम इंडियाने अलीकडेच एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा धुव्वा उडवला आणि आयसीसी क्रमवारीतही पहिले स्थान पटकावले. आणि आता दोन्ही संघांमधील टी-20 मालिकेची पाळी आहे. आता शुक्रवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना 27 जानेवारी रोजी JSCA आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रांची येथे खेळवला जाईल.
पहिला T20 सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.
थेट प्रक्षेपण कुठे पाहू शकता?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या T20 सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल.
लाईव्ह स्ट्रीमिंग कोठे केले जाईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या T20 सामन्याचे थेट प्रसारण डिस्ने हॉटस्टार अॅपवर केले जाईल.
सामना विनामूल्य कुठे पाहू शकता?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 सामना डीडी स्पोर्ट्स चॅनलवर पाहता येईल.
भारतीय संघ- हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव , युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.
न्यूझीलंड संघ- मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, डेन क्लीव्हर, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेंजामिन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिप्पन, हेन्री शिपले, ईश सोधी, ब्लेयर टिकनर.