रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंड विरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना खेळणार आहे. शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारतीय संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0अशी आघाडी कायम ठेवली आहे. दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया इतिहास रचणार आहे कारण रायपूरमध्ये भारतीय संघ जे साध्य करणार आहे ते जागतिक क्रिकेटमधील इतर कोणत्याही संघाने मिळवले नाही.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशन भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसणार आहेत. जर हे तीन द्विशतक फलंदाज प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील झाले आणि मैदानात उतरले तर वनडे क्रिकेटमध्ये हे जगातील पहिलेच असेल की एका संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन द्विशतक फलंदाज एकत्र खेळताना दिसतील.
रोहितने वनडेमध्ये आतापर्यंत चार द्विशतके झळकावली आहेत, तर ईशानने गेल्या महिन्यात बांगलादेशविरुद्ध पहिले द्विशतक झळकावले होते. त्याचबरोबर शुभमन गिलने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 208 धावा करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. जगात असा कोणताही संघ नाही ज्याने एकदिवसीय सामन्यातील कोणत्याही एका सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन द्विशतके झळकावणाऱ्या फलंदाजांना मैदानात उतरवले आहे. अशा स्थितीत रोहित, गिल आणि ईशान यांना आता संघाकडून खेळताना विशेष विक्रम करण्याची संधी आहे.
भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर/उमरान मलिक.