भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना रांचीमध्ये खेळला जात आहे. टीम इंडिया पुन्हा एकदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या हाती आहे. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंड संघाने भारताला 177 धावांचे लक्ष्य दिले आहे. याआधी वनडे मालिकेत भारताने न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव करत क्लीन स्वीप केला होता. आता या सामन्यात भारतीय संघ विजयाने मालिकेची सुरुवात करतो की आज किवींचा विजय होतो हे पाहावे लागेल.
न्यूझीलंड संघाने निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 176 धावा केल्या. किवी संघाकडून दोन अर्धशतके झळकावण्यात आली. प्रथम डेव्हन कॉनवेने 35 चेंडूत 52 धावांची खेळी केली. यानंतर अखेरीस डॅरिल मिशेलने 30 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. अर्शदीप सिंगने 20 वे षटक टाकले, ज्यात मिशेलने षटकार मारून हॅट्ट्रिक केली. या षटकात एकूण 27 धावा आल्या.
Innings Break!
New Zealand post 176/6 on the board!
2⃣ wickets for @Sundarwashi5
1⃣ wickets each for @imkuldeep18, @ShivamMavi23 & @arshdeepsinghhOver to our batters now 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/gyRPMYVaCc #TeamIndia | #INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/v48HAfGUil
— BCCI (@BCCI) January 27, 2023