
IND vs NED: भारताने T20 विश्वचषक स्पर्धेतील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सचा पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. भारताने नेदरलँडचा 56 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यांच्या अर्धशतकांच्या बळावर 20 षटकांत 2 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, नेदरलँडचा संघ एकदाही पाठलाग करताना आक्रमक दिसला नाही आणि याचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच त्यांच्यावर दबाव आणला, परिणामी नेदरलँड संघ 20 षटकात केवळ 9 गडी गमावून फक्त 124 धावा करू शकला. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला होता.
भारताने दिलेल्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ पहिल्याच षटकातच दडपणाखाली दिसला. भुवनेश्वर कुमारने पॉवरप्लेमध्ये आपली दोन्ही षटके मेडन केली आणि एक विकेटही घेतली. विक्रमजीत 9 चेंडूत एक धाव काढून बाद झाला. मॅक्स 10 चेंडूत 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. नेदरलँड्सने ठराविक अंतराने विकेट गमावल्या, त्यामुळे संघाला भारताचे लक्ष्य गाठता आले नाही. भारताकडून भुवनेश्वर, अर्शदीप, अक्षर पटेल, अश्विन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
A comprehensive win for India at the SCG against Netherlands 🙌🏻#NEDvIND | #T20WorldCup | 📝: https://t.co/9FPx3tOBBe pic.twitter.com/1a9Nz0sOiM
— ICC (@ICC) October 27, 2022
T20 विश्वचषक 2022 मधील त्यांच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने नेदरलँड्ससमोर विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून रोहित शर्माशिवाय विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी नाबाद अर्धशतके झळकावली. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. उपकर्णधार केएल राहुल तिसऱ्या षटकात केवळ 9 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. सलग दुसऱ्या सामन्यात राहुलची बॅट नि:शब्द झाली आहे. नेदरलँडच्या गोलंदाजांनी पहिल्या 6 षटकांत आपली पकड घट्ट केली. पॉवरप्लेमध्ये भारताला 1 गडी गमावून केवळ 32 धावा करता आल्या. भारताने 9व्या षटकात 50 धावा पूर्ण केल्या. 10 षटकापर्यंत टीम इंडियाची धावसंख्या 1 गडी गमावून 67 धावा होती. रोहित आणि कोहली यांच्यातील अर्धशतकी भागीदारीही याच काळात पूर्ण झाली. रोहित शर्मानेही वेग पकडत 35 चेंडूत 29 वे अर्धशतक झळकावले, मात्र तो 53 धावा करून क्लासेनचा बळी ठरला. यानंतर कोहलीला साथ देण्यासाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने 95 धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. विराट कोहलीने 37 चेंडूत अर्धशतक ठोकले. या खेळीच्या जोरावर तो T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ख्रिस गेलला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. डावाच्या शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने षटकार ठोकला आणि 25 चेंडूत 51 धावा केल्या. कोहली ६२ धावांवर नाबाद राहिला.