IND vs ENG: हैदराबाद कसोटीत टीम इंडियाच्या पराभवाची मुख्य 5 कारणे

0
WhatsApp Group

India vs England 1st Test: हैदराबाद कसोटीत भारतीय संघाला 28 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाला सामना जिंकण्यासाठी 231 धावांचे लक्ष्य होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून टीम इंडिया चौथ्या दिवशी 202 धावांवर ऑलआऊट झाली. टॉम हार्टलेने दुसऱ्या डावात इंग्लंडसाठी शानदार गोलंदाजी केली. टॉम हार्टलेने दुसऱ्या डावात 7 विकेट घेतल्या. याशिवाय जो रूटनेही शानदार गोलंदाजी केली. इंग्लंडने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत 420 धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाला विराट कोहलीचीही उणीव भासली आहे.

भारताच्या पराभवाची 5 कारणे

1. रोहित शर्मा: पहिल्या आणि दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केल्यानंतर रोहित शर्मा 24 आणि 37 धावांची इनिंग खेळून बाद झाला. दोन्ही डावात चुकीचे फटके खेळून भारतीय कर्णधार बाद झाला. जे भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. रोहितला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या स्कोअरमध्ये रूपांतर करणे आवश्यक होते, जे त्याने बर्याच काळापासून केले नाही.

2. शुभमन गिलची ‘फ्लॉप’ फलंदाजी: शुभमन गिल दुसऱ्या डावात खाते न उघडता बाद झाला. गिलने गेल्या 10 कसोटी डावांमध्ये केवळ 160 धावा केल्या आहेत. हैदराबाद कसोटीत भारताच्या पराभवाचे दुसरे कारण गिलचा खराब फॉर्म ठरला आहे. त्यानंतर आता शुभमन गिलवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

3. श्रेयस अय्यरची सतत खराब कामगिरी : श्रेयस अय्यरची खराब कामगिरी हेही भारताच्या पराभवाचे तिसरे कारण ठरले आहे. अय्यरने गेल्या अनेक सामन्यांत कसोटी फॉरमॅटमध्ये धावा केल्या नाहीत. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अय्यरला केवळ 13 धावा करता आल्या आणि पुन्हा एकदा अय्यरने संघाची निराशा केली. अय्यरला संघात आणण्यासाठी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसारख्या दिग्गजांना दार दाखवण्यात आले आहे. जो आता चुकीचा निर्णय असल्याचे सिद्ध होताना दिसत आहे.

4. गोलंदाजांचा अतिआत्मविश्वास: भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात सारखी देहबोली दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना दिसले नाही. भारतीय फिरकी गोलंदाज आक्रमकतेपेक्षा अधिक बचावात्मक गोलंदाजी करत होते, ज्यामुळे इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करण्याची आणि मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली.

5. विराट कोहली: भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली आज जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, पहिल्या कसोटीत भारताच्या पराभवामागे कोहलीची अनुपस्थिती हेही प्रमुख कारण आहे. या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विराट कोहली बाहेर आहे. अशा परिस्थितीत आता टीम इंडियाला पुन्हा एकदा दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावे लागू शकते.