IND vs ENG: सूर्यकुमार यादव T20मध्ये शतक करणारा ठरला पाचवा भारतीय

WhatsApp Group

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना नॉटिंगहॅम येथे खेळला जात आहे. जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मलान-लिव्हिंगस्टोनने प्रथम फलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय योग्य असल्याचे सिद्धही केले. मलानने 39 चेंडूत 77 धावांची धडाकेबाज खेळी केली, तर लिव्हिंगस्टोनने नाबाद 42 धावा केल्या. इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताकडून हर्षल पटेल आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

216 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. ऋषभ पंत (1), विराट कोहली (11), कर्णधार रोहित शर्मा (11) आणि दिनेश कार्तिक (6) लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, यानंतर सूर्यकुमार चौथ्या क्रमांकावर आला आणि त्याने अवघ्या 48 चेंडूत शतक झळकावले. टी-२० मध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा पाचवा भारतीय ठरला आहे. चौथ्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो केएल राहुलनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.