
IND vs ENG : इंग्लंडच्या बर्मिंगमह येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) सामन्यात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart broad) एक खास रेकॉर्ड केला आहे. एकीकडे त्याच्या एका षटकात तब्बल 35 धावा आल्याने ही कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी ओव्हर ठरली आहे. पण दुसरीकडे त्याने घेतलेल्या एका विकेटमुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 550 विकेट्स पूर्ण करत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. आणखी 13 विकेट्स घेताच तो ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी क्रिकेटर ग्ले मॅग्राथ (Glen Macgrath) याला मागे टाकेल.
भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी सामन्यात ब्रॉडच्या नावावर एक खराब रेकॉर्डही झाला आहे. भारताच्या डावातील 84 व्या षटकात बुमराहने ब्रॉडच्या चेंडूवर पहिल्या चेंडूपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या बॉल वाईडच्या दिशेने जात चौकार गेला. मग तिसरा चेंडू नो बॉल होता ज्यावर बुमराहने षटकार ठोकला. मग सलग तीन चौकार ठोकल्यावर पाचव्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर शेवटच्या चेंडूवरही बुमराहने एक धाव घेतली. ज्यामुळे कसोटी सामन्यातील एका षटकात 35 धावा खाण्याची नामुष्की ब्रॉडच्या नशिबी आली. याआधी सर्वात महागडं षटक हे 28 धावाचं होतं. पण त्याने पहिल्या डावात मोहम्मद शमीला बाद केल्यामुळे 550 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या असून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तो सहाव्या स्थानी पोहोचला आहे.
An all-time great 👑
Scorecard/Videos: https://t.co/jKoipFmvoB
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/qazoaNT5eJ
— England Cricket (@englandcricket) July 2, 2022
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत श्रीलंकेचा दिग्गज माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या नावावर 800 विकेट्स असून दुसऱ्या स्थानावर शेन वॉर्न 708 विकेट्ससह विराजमान आहे.तर तिसऱ्या स्थानावर इंग्लडचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसन 653 विकेट्ससह विराजमान आहे.