IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर, ‘हा’ खेळाडू असणार कर्णधार
India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यात पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्याप संघ जाहीर झाला नव्हता. ही पाच सामन्यांची मालिका खूप महत्त्वाची आहे कारण ती जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जाणार आहे. टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये जायचे असेल, तर कोणत्याही किंमतीवर मालिका काबीज करावी लागेल. दरम्यान, या मालिकेसाठी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. संघाची कमान पुन्हा एकदा बेन स्टोक्सच्या हाती असेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका 25 जानेवारीपासून सुरू होणार आहे. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर होणार आहे. यानंतर दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. मालिकेतील तिसरा सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे. शेवटचा आणि पाचवा सामना 7 मार्चपासून खेळवला जाणार आहे. हा सामना धर्मशाला येथे होणार आहे. हा सामना 11 मार्चला संपणार आहे. यानंतर टीम इंडिया कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. यानंतर कधीही आयपीएल 2024 सुरू होऊ शकते, असे मानले जात आहे.
बेन स्टोक्स इंग्लंडचे कर्णधारपद भूषवणार, अनेक नव्या खेळाडूंनाही मिळणार संधी
इंग्लंडने जाहीर केलेल्या संघात कर्णधार बेन स्टोक्स कायम राहणार आहे. रेहान अहमद, गस ऍटकिन्सनही आहेत. संघात जेम्स अँडरसन आणि जॉनी बेअरस्टोसारखे तगडे खेळाडू नक्कीच असतील. कसोटी पदार्पणाच्या प्रतिक्षेत असलेल्या शोएब बशीरसारख्या नवीन आणि युवा खेळाडूलाही स्थान देण्यात आले आहे. शोएब बशीरचे प्रथम श्रेणीचे आकडे बरेच चांगले आहेत. जॅक क्रॉली, बेन डकेट, हॅरी ब्रूक, बेन फॉक्स, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड यांनाही संघात स्थान मिळाले आहे. तसेच टॉप हार्टली हा नवीन आणि तरुण फिरकीपटू आहे, ज्याची पहिली कसोटी भारतात होणार आहे. त्याने आतापर्यंत दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत, परंतु अद्याप त्याचे कसोटी पदार्पण झालेले नाही. सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून, लवकरच या मालिकेसाठी भारतीय कसोटी संघाचीही घोषणा केली जाईल, असे मानले जात आहे.
All set for India! 💪
Our 16-player squad for the five-Test series 🏏
🇮🇳 #INDvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/z7UjI634h1
— England Cricket (@englandcricket) December 11, 2023
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप , ओली रॉबिन्सन, जो रूट, मार्क वुड.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिली कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद
- दुसरी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विझाग
- तिसरी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट
- चौथी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची
- पाचवी कसोटी: भारत विरुद्ध इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला