IND Vs ENG: सरफराज खानचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण; वडील सर्वांसमोर ढसाढसा रडले

WhatsApp Group

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये सुरू झाला आहे. टीम इंडियाच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सरफराज खानला या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. वर्षानुवर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करणाऱ्या सरफराजचे आता त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. हा सामना पाहण्यासाठी सरफराजचे वडील राजकोटच्या मैदानावर उपस्थित आहेत आणि सरफराजला डेब्यू कॅप मिळताच त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.

टेस्ट कॅप घेऊन सरफराज सर्वप्रथम वडिलांकडे गेला. वडिलांनी कॅप हातात घेऊन डोळे भरून पाहिली, यानंतर त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. या प्रसंगी त्यांनी सरफराजला कडकडून मिठी मारली. या प्रसंगाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.