IND vs ENG : पुजाराने केली सुनील गावस्करांशी बरोबरी, 36 वर्षांनंतर केली ‘ही’ कामगिरी

WhatsApp Group

एजबॅस्टन : चेतेश्वर पुजाराने 5व्या कसोटीच्या दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक झळकावून संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 3 बाद 125 धावा केल्या होत्या. मागील काही काळापासून चेतेश्वर पुजारा खराब फॉर्मशी झुंजत होता. यामुळे तो संघातून बाहेरही होता. पण 5 व्या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद अर्धशतक झळकावून टीम इंडियाला चांगल्या स्थितीत आणले आहे. तो आता 50 धावांवर खेळत आहे.

टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात 3 बाद 125 धावा केल्या आहेत. त्यांची एकूण आघाडी 257 धावांवर गेली आहे. ऋषभ पंत 30 धावा केल्यानंतर पुजारा सोबत क्रीजवर उभा आहे. पंतने पहिल्या डावात 146 धावांची मोठी खेळी केली होती. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पुढे आहे.

एजबॅस्टनवर फलंदाजी करणे कुणासाठीही सोपे नाही. भारतीय सलामीवीर म्हणून पुजाराने 36 वर्षांनंतर मैदानावर अर्धशतक झळकावले आहे. यापूर्वी जुलै 1986 मध्ये सुनील गावस्कर यांनी हा पराक्रम केला होता. या सामन्यात पुजाराने सुरुवातीच्या धक्क्यानंतर भारतीय डाव मोठ्या काळजीने हाताळला आणि संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.

पुजाराला पहिल्या डावात केवळ 13 धावा करता आल्या. दुसरीकडे शुभमन गिलने दोन्ही डावात अनुक्रमे 17 आणि 4 धावा केल्या. या मैदानावर आतापर्यंत केवळ 4 भारतीय खेळाडूंना शतक झळकावता आले आहे. या सामन्यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने हे केले होते. या सामन्यात पंत आणि रवींद्र जडेजाने शतके झळकावली.

चेतेश्वर पुजारालाही 10 वर्षांपासून कसोटीत शतक झळकावता आलेले नाही. त्याने आपले शेवटचे शतक जानेवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झळकावले होते. त्यानंतर त्याने 193 धावांची सर्वोत्तम खेळी केली. त्यानंतर त्याला आतापर्यंत 50 डावांत तिहेरी आकडा गाठता आलेला नाही. 34 वर्षीय चेतेश्वर पुजाराचे कसोटी कारकिर्दीतील हे 33 वे अर्धशतक आहे. या सामन्यापूर्वी त्याने 95 सामन्यात 44 च्या सरासरीने 6713 धावा केल्या होत्या. 18 शतके आणि 32 अर्धशतके केली. नाबाद 206 धावांची सर्वात मोठी खेळी केली.