
Ind vs Eng : एजबॅस्टन कसोटीच्या चौथ्या दिवशी यजमान इंग्लंड संघाने भारतावर आपली पकड घट्ट केली आहे England vs India, 5th Test. भारताने दिलेल्या 378 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने चौथ्या दिवसाअखेर 3 गड्यांच्या मोबदल्यात 259 धावा केल्या आहेत. इंग्लंडसाठी Joe Root जो रूट 76 आणि Jonny Bairstow जॉनी बेअरस्टो 72 धावांवर नाबाद आहेत. चौथ्या विकेटसाठी या दोन्ही खेळाडूंमध्ये 150 धावांची भागीदारी झाली आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना अॅलेक्स लीज (56) आणि जॅक क्रॉली (46) यांनी इंग्लंडला झंझावाती सुरुवात करून दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर जसप्रीत बुमराहच्या कहरने इंग्लंडला काही काळ बॅकफूटवर ढकलले होते. बुमराहने क्राउली आणि पोपला बाद केले, तर अॅलेक्स लीज धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.
तत्पूर्वी, भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावात सर्वबाद 245 धावा करत इंग्लंडच्या संघाला विजयासाठी 378 धावांचे लक्ष्य दिले. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक 66 आणि ऋषभ पंतने 57 धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. याशिवाय स्टुअर्ट ब्रॉड आणि मॅथ्यू पॉट्सने प्रत्येकी दोन बळी घेतले. जेम्स अँडरसन आणि जॅक लीच यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.