IND vs ENG : टीम इंडियाच्या पराभवामागची 5 कारणे

WhatsApp Group

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला आहे. भारताचा 10 गडी राखून पराभव करून इंग्लंडने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले असून रविवारी त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 168 धावा केल्या होत्या, याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडने 16 षटकात एकही विकेट न गमावता हा सामना जिंकला. या पराभवामुळे भारताचे फायनल खेळण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. टीम इंडिया 2014 मध्ये टी-20 वर्ल्ड कपची शेवटची फायनल खेळली होती, जिथे त्यांना श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला होता. आता 13 नोव्हेंबरला अंतिम फेरीत इंग्लंडचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.

इंग्लंडने तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 2010 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंडने 2016 मध्येही अंतिम फेरी गाठली होती आणि आता 6 वर्षांनंतर हा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाच्या पराभवाची 4 मोठी कारणे जाणून घेऊया.

  • टीम इंडियाची सलामीची भागीदारी सुपर-12 मध्ये अपयशी ठरली होती आणि उपांत्य फेरीतही तेचं दिसून आलं. इंग्लंडविरुद्ध केएल राहुल 5 धावा करत झेलबाद झाला तर रोहित शर्मा 27 धावा करत तंबूत परतला. टीम इंडियाला चांगली सुरुवात करता आली नाही आणि पॉवरप्लेमध्ये त्यांना केवळ 38 धावा करता आल्या.
  • कर्णधार रोहित शर्माची बॅट संपूर्ण टी-20 विश्वचषकात चालली नाही आणि उपांत्य फेरीतही तेच दिसले. रोहितने 28 चेंडूत 27 धावा केल्या, त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा कमी होता. दुसरीकडे सूर्यकुमार यादवने 10 चेंडूत 14 धावा केल्या.
  • सुपर-12 मध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर कुमार यांनी उपांत्य फेरीत निराशा केली. पॉवरप्लेमध्ये दोघांना ना विकेट घेता आल्या ना धावा रोखता आल्या. शमी, अश्विन आणि पांड्या यांनीही प्रत्येक षटकात 10 पेक्षा जास्त धावा दिल्या.