Yashasvi Jaiswal: शानदार,जबरदस्त यशस्वी, झळकावले शानदार द्विशतक

WhatsApp Group

Yashasvi Jaiswal double century: राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध द्विशतक झळकावले आहे. केवळ 7वी कसोटी खेळत असलेल्या जयस्वालचे युवा कारकिर्दीतील हे दुसरे द्विशतक आहे.  जयस्वालने दमदार फलंदाजी करत तिसऱ्या दिवशी आपले द्विशतकपूर्ण केले.

गेल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर बराच काळ फ्लॉप ठरलेला फलंदाज शुभमन गिलने पुन्हा एकदा डावाची धुरा सांभाळत 91 धावा केल्या. मात्र, गिल धावबाद झाला आणि त्याचे शतक हुकले. दुसरीकडे कुलदीप यादवनेही गिलला भरपूर साथ दिली. या डावात कुलदीपने 27 धावा केल्या आहेत. यानंतर यशस्वी जैस्वालने इंग्लंडच्या जखमेवर मीठ शिंपडले आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जैस्वाल रिटायर्ड हर्ट झाला होता, मात्र सामन्याच्या चौथ्या दिवशी गिल बाद झाल्यानंतर जैस्वाल पुन्हा खेळायला आला आणि त्याने षटकार आणि चौकारांचा पाऊसच पाडला. चौथ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात अनुभवी जेम्स अँडरसनच्या षटकात सलग तीन षटकार मारून त्याने आपले इरादे व्यक्त केले.

जयस्वाल राजकोटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज ठरला.
राजकोटच्या मैदानावर फलंदाजाने द्विशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. या खेळीसह जैस्वाल बेन डकेटला मागे टाकत या मैदानावर सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या करणारा फलंदाज बनला आहे. डकेटने सध्याच्या कसोटीत 153 धावांची इनिंग खेळली होती. या मैदानावर तिसरी सर्वोच्च धावसंख्या विराट कोहलीच्या नावावर आहे (139 धावा वि. वेस्ट इंडिज, 2018).

क्रिकेट विश्वात शोककळा! या दिग्गज क्रिकेटपटूचे झाले निधन